कोरोना काळात अनेकांच्या नोकर्‍या गेल्या, बेरोजगार झालेल्या तरुण वर्गाला आता काहीतरी कामधंदा करणं गरजेचं आहे, त्यामुळं प्रत्येकजण नोकरीसाठी शोधमोहीम सुरु करतो. उदरनिर्वाह करण्यासाठी काही नाही काही पावलं उचलायला हवीतच. त्यामुळंच अनेकांचा कल हा आपल्याला पटकन कुठंतरी काम मिळेल अशी आशा बाळगुन असतो व ताबडतोब स्मार्टफोनच्या माध्यमातून नोकरीच्या शोधासाठी ऑनलाईन शोधमोहिम सुरु करतो. एरवी तरुण वर्ग घरबसल्या काही ना काही पार्ट टाईम जॉब मिळवण्याच्या धडपडीत नेहमीच असतो. ऑनलाईन नोकरी मिळवण्यासाठी किंवा घरबसल्या प्रत्येकजण काही तरी काम मिळवून त्यातून पैसा कमवण्याचा अनेकांचा त्याकडे ओघ तर असतोच शिवाय त्याप्रमाणे प्रयत्नशिलही असतो. एक्ट्रा इनकम कोणाला नको आहे, प्रत्येकाला श्रीमंत व्हायचं आहे. त्यामुळे पैसा जेवढा जास्त कमवता येईल तेवढा कमवावा असा सर्वांचा प्रामाणिक प्रयत्न असतो. ऑनलाईन शोधमोहिम सुरु केल्यानंतर अनेक सोशल मिडीयावर अनेक फसव्या जाहिराती असतात व काही खर्‍या जाहिराती असतात. आता हया खर्‍या आणि फसव्या कशा ओळखायच्या हा सर्वांसमोर खुप मोठा पेच आहे. सोशल मिडीयावर ऑनलाईन पैशांवर डल्ला मारणारी टोळी नेहमीच तत्पर असते शिवाय दिवसागणीक कित्येकजणांना ही टोळी पैशाला भुर्दंड करत असेल याचं मोजमाप नाही. अनेकांना ऑनलाईनच्या माध्यमातून फसवणुक करुन गंडवणे हा त्यांचा मुळ धंदा. परंतू यापासून आपली कोणत्याही प्रकारे फसवणूक होऊ नये असं आपल्याला वाटंत असेल तर आपण सतर्क रहायलाचं हवं. आपण आपली कोणत्याही माध्यमातून फसवणूक होऊ नये यासाठी अतिशय हुशारीने पावलं उचलायला हवीत. सोशल मिडीयाच्या माध्यमातून अनेक वेळेस सकारात्मक माहितीचा सुध्दा प्रसार केला जातो. त्यामध्ये सोशल मिडीयापासून व ऑनलाईन होणार्‍या फसवणुकीपासुन स्वत:चा बचाव कसा करायचा याबाबत माहिती दिलेली असते. ती माहिती वाचून व व्हिडिओ पाहून आपण अशा प्रकारे केलेल्या जनजागृतीचा फायदा घेऊ शकतो व अशा प्रकारच्या फसवणुकीपासून आपण आपला बचाव करू शकतो. सर्वात महत्त्वाचं म्हणजे सध्या घर बसल्या कमवा अशा प्रकारचा मेसेज सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे. पण आपण याबाबतीत अगदी खात्रीशीर विचार करूनच निर्णय घेतलेला केव्हाही चांगला, कारण या आधी घर बसल्या कमवा या जाहिराती खाली तुमच्या खिशाला कात्री लावण्यासाठी चोरट्यांची टोळी सज्ज आहे व अशा प्रकारच्या चोरीच्या घटना यापूर्वीही प्रचंड प्रमाणात घडलेल्या आहेत. अनेक वेळेला घरबसल्या कामवा म्हणून मोबाईल नंबर सोशल मीडियावर प्रकाशित केला जातो एखादी व्यक्ती त्या व्यक्तीला फोनवर संपर्क करते व त्याला सांगितलं जातं की, आमच्याकडून अमुक अमुक प्रकारचे घरबसल्या तुम्हाला काम दिले जाईल. त्यासाठी जॉईनिंग फीस किंवा नोंदणी शुल्क तुम्हाला भरावे लागेल. किंवा अमुक अमुक या क्रमांकावर किंवा अमुक अमुक खात्यामध्ये तुम्ही अमुक अमुक एवढी रक्कम जमा करावी लागेल. महत्वाचं म्हणजे नोकरी मिळवण्यासाठी किंवा एखादं काम मिळवण्यासाठी बेरोजगारासाठी हा खूप जिव्हाळ्याचा विषय असल्यामुळे हे करण्यासाठी त्याला भाग पडते व तो त्या खात्यामध्ये त्या मोबाईलवर पैसे पाठवतो त्याची यामाध्यमातून फसवणूक केली जाते आणि ही गोष्ट लक्षात आल्यानंतर वेळ निघून गेलेली असते. त्यामुळे याचा काहीही उपयोग होत नाही. सर्वच जाहिराती फसव्या असतात असं पण नाही, अनेक वेळेला एखाद्या व्यक्तीला अनेकांचे संपर्क क्रमांक हवे असतात त्यामुळे हे जाणून बुजून अशा प्रकारच्या पोस्ट सोशल मीडियावर करतो व अत्यंत हुशारीने या माध्यमातून समोरच्याची आर्थिक फसवणूक करु शकते. त्यामुळे लॉकडाऊन काळामध्ये कसल्याही प्रकारच्या आमिषाला बळी पडू नका. कसल्याही प्रकारचा मोह धरून घर बसल्या कमवा च्या पोस्टला रिप्लाय देऊ नका. खात्री करूनच निर्णय घ्या.

– शंकर चव्हाण 9921042422

Leave a Reply

Your email address will not be published.

सर्वाधिक पसंती

error: Content is protected !!