केज! प्रतिनिधी
केज येथील आदर्श पत्रकार संघ, सक्रिय पत्रकार संघ, झुंजार पत्रकार संघ, स्वाभिमानी पत्रकार संघ, पुरोगामी पत्रकार संघ विश्वगामी पत्रकार संघ. डिजिटल मिडीया केज यांच्या संयुक्त विद्यमाने ‘पत्रकारितेतील नवे प्रवाह’ या विषयावर दिनांक 12 फेब्रुवारी 2023 रोजी एक दिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे.
या कार्यशाळेचे उदघाटन केज शहर व तालुक्यातील सर्व अधिकारी व पद अधिकारी यांच्या उपस्थितीत होणार आहे,
दिनांक 12 फेब्रुवारी 2023 रोजी ‘पत्रकारितेतील नवे प्रवाह’ या विषयावरील ही कार्यशाळा केज येथे होणार आहे . या कार्यशाळा संबोधित करण्यासाठी ज्येष्ठ पत्रकार विलास बडे ज्ञानदा कदम, सुशिल कुलकर्णी, , प्रभाकर सुर्यवंशी, माहिती अधिकारी किरण वाघ साहेब, एस एम देशमुख व जिल्ह्यातील संपादक, पत्रकार व केज, अंबाजोगाई, धारूर तालुक्यातील सर्व पत्रकार या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत ,माध्यमातील नव्या प्रवाहाबाबत कार्यशाळा पत्रकार आणि पत्रकारितेचे प्रतिनिधी यांच्यासाठी खुली आहे. या कार्यशाळेत जास्तीत जास्त पत्रकार आणि पत्रकारितेच्या संबंधित व्यक्तीनी सहभागी व्हावे असे आवाहन केज येथील सर्व पत्रकार संघाचे अध्यक्ष, सचिव व सदस्यांनी केले आहे