Spread the love

 

केज / प्रतिनिधी

तालुका विधी सेवा समिती केज व वकील संघ केज यांच्या संयुक्त विद्यमाने दि.२१.०१.२०२३ रोजी स्वामीविवेकानंदविद्यालय,केज येथे कायदेविषयक जनजागृती शिबीर घेण्यात आले.सदर कार्यक्रमास अध्यक्षपदी एस.व्ही. पावसकर,दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर
केज या होत्या.तसेच मा. श्री.एन.डी.गोळे,सह दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर केज,श्री.पी.व्ही. पाटील,२रे सह दिवाणी न्यायाधीश कनिष्ठस्तर केज,श्री. के.एन.निवडंगे ४थे सह दिवाणी न्यायाधीश कनिष्ठस्तर केज,तसेच अॕड.डी.टी. सपाटे,अॕड.एस.व्ही मिसळे,अॕड.पी.एच.नाईकवाडेअॕड.सुनील कुलकर्णी आदी ज्येष्ठ विधिज्ञ उपस्थित होते.सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री.घाडगे सर यांनी केले.
अँड.एस.व्ही.मिसळे यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले.या कार्यक्रमात श्री. के.एन.निवडंगे ४ थे सह दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर केज यांनी NALSA (Legal Services to Workers in the Unorganized Sector), Scheme, २०१५ विषयी सखोल व माहितीपूर्ण मार्गदर्शन केले.श्री.पी.व्ही.पाटील,२ रे सह दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर केज यांनी Early Access to Justice at Pre-Arrest, Arrest and Remand Stage या विषयावर मार्गदर्शन केले.अँड.डी.टी.सपाटे यांनी National Human Trafficking Awareness Day, National Youth Day या विषयावर मार्गदर्शन केले.आपल्या प्रास्ताविकात अँड.एस. व्ही.मिसळे यांनी Balika Divas, National Voters Day, Republic Day, Public Utility Services AND Central / State Government Scheme या विषयावर मार्गदर्शन केले.तसेच पोलिस उपनिरीक्षक पाटील साहेबांनी Road Safety and Traffic Signs, Protection to good Samaritans या विषयावर मार्गदर्शन केले. सहा पोलिस निरीक्षक श्री. शंकर वाघमोडे यांनी Organise awareness programmes on POSCO Act at Schools and colleges या विषयावर सखोल माहिती उपस्थितांना दिली.एस. व्ही.पावसकर दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर, केज यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात उपरोक्त नमूद विषयावर सखोल व उपयुक्त अशी माहिती उपस्थितांना दिली.शेवटी श्री.जी.बी. गदळे यांनी उपस्थीतांचे आभार मानले. या कार्यक्रमास २२० लाभार्थी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published.

सर्वाधिक पसंती

error: Content is protected !!