अंबाजोगाई (प्रतिनिधी )
डॉ.व्दारकादास लोहिया, शैला लोहिया यांनी मानवलोकच्या माध्यमातून जनसामान्यासाठी सातत्याने कार्य केले हे कार्य प्रेरणादायी असून याच कार्याचा वारसा पुढील पिढी चालवित असल्याचे मत राष्ट्रसेविका समितीच्या प्रमुख पदाधिकारी नभा वालवडकर यांनी व्यक्त केले
दानशुरांनी केलेल्या अर्थ साहाय्यातुन निराधारांना किराणा साहित्याचे वितरण रविवारी करण्यात आले. यावेळी त्या बोलत होत्या.
व्यासपीठावर कल्पना लोहिया, शिल्पा चिखले, परवीन बेगम, साबेरा शेख, जमादार बडे, आदेश कर्नावट आदी उपस्थित होते.
पुढे बोलताना वालवडकर म्हणाल्या की, मानवलोक संस्थेचे लोकाभिमुख कार्य सर्वदुर पर्यंत पोहंचले असून पुढील पिढी कल्पनाताई,अनिकेत भैय्या हे देखील तो वारसा समर्थपणे पुढे घेऊन जात आहेत आमच्या परिवाराची बाबुजी आणि भाभींमुळे ओळख झाल्याचेही वालवडकर म्हणाल्या
संघर्षाची ताकद बाबुजी आणि भाभींनी दिली म्हणून स्वतःच्या पायावर मी उभे राहिल्याचे शिल्पा चिखले यांनी सांगितले. माझा बालविवाह झाला त्यातून पुन्हा मानसिक आणि शारीरीक छळ होत असताना त्याला तोंड देऊन स्वतःला उभ करून सामाजिक कार्याला झोकून दिल्याचे साबेरा शेख यांनी सांगितले.
जमादार बडे यांनीही मनोगत व्यक्त केले.
अडचणीवर मात करीत महिलांनी शिकून स्वावलंबी बनले पाहीजे.
प्रत्यक्षरित्या दुःखितांचे अश्रु पुसण्यासाठीच्या कामासाठी मानवलोक जनसहयोग संस्था दानशूर व्यक्तींच्या अर्थ साहाय्यातुन निराधार वृध्द,अपंग,अंध,आजारग्रस्त उपेक्षितांसाठी कार्य करते असे सांगुन इतर उपक्रमाबद्दलची माहिती कल्पना लोहिया यांनी प्रास्तविकातून सांगितली. सुरुवातीला संजना आपेट सावित्री सागरे यांनी स्वागतगीत गायिले
शाम सरवदे यांनी संचालन करून उपस्थितांचे आभार मानले.
कार्यक्रमासाठी कृष्णा,दिलीप मारवाळ यांच्यासह इतरांनी परीश्रम घेतले.