अंबाजोगाई(प्रतिनिधी)
छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) विभागातुन निवडणुकीसाठी उभा असलेले भाजपा तथा महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेचे अधिकृत उमेदवार श्री किरण पाटील यांच्या निवडणुक प्रचारासाठी भाजपाचे प्रदेश अध्यक्ष मा.चंद्रशेखर बावनकुळे यांनी किरण पाटील यांच्या उमेदवारीला आपण सर्वांनी समर्थन द्यावं आणि सर्वांनी त्यांना मदत करून मताचे कर्ज द्यावं असे मत.अंबाजोगाई येथे शिक्षक मतदार मेळाव्या प्रंसगी व्यक्त केले
दि.20 रोजी सायंकाळी 6 वाजता खोलेश्वर महाविद्यालयाच्या मैदानावर झालेल्या
या मेळाव्यास भाजपाचे प्रदेश अध्यक्ष मा.चंद्रशेखर बावनकुळे तथा भाजपाच्या राष्ट्रीय सचिव पंकजाताई गोपीनाथ मुंडे, जिल्ह्याच्या खा.डॉ.सौ.प्रितमताई मुंडे , निवडणुक समन्वयक श्री बसवराज मंगरूळे आप्पा, जिल्हाध्यक्ष श्री राजेंद्र मस्के, आ.लक्ष्मण आण्णा पवार, जेष्ठ नेते नंदकिशोर मुंदडा, युवा नेते अक्षय मुंदडा, रमेशराव आडसकर, भाशिप्र कार्यवाह डॉ.हेमंत वैद्य, स्थानिक कार्यवाह बिपिन क्षीरसागर, दीनदयाळ बँक चेअरमन अॅड.मकरंद पत्की, मोहन जगताप, डॉ.स्वरूपसिंह हजारी, तालुका अध्यक्ष अच्युतराव गंगणे, भगवान केदार, सतिश मुंडे, अॅड.बालासाहेब चोले आदी मान्यवरांची व्यासपीठावर उपस्थित होते.
पुढे बोलताना बावनकुळे म्हणाले की
सर्वसाधारण निवडणुकीमध्ये एखादी गर्दी मी समजू शकतो सर्वसाधारण निवडणुका असतात पण शिक्षक परिषदेच्या निवडणुकीमध्ये 7000 च्या वर लोकं मतदार किरण पाटलांचा फॉर्म भरायला आले खरंतर निवडणुकीमध्ये मोठी त्या ठिकाणी रॅली आणि प्रवास त्या ठिकाणी त्या रॅलीचा झाला आणि किरण पाटील यांनी 7000 च्यावर मतदारासह आपला नामांकन पत्र दाखल केला. त्याच दिवशी खरी रंगत या निवडणुकीमध्ये आली आणि आपली ही निवडणूक सुरू झाली.किरण पाटील निवडून आल्यानंतर आपले कर्ज फेडतील.
आज या ठिकाणी खर तर मला किरण पाटील बद्दल सांगत आहे एकीकडे आमदार नसताना जेव्हा शिक्षकांच्या प्रश्न होता महाविकास आघाडीचे सरकार होतं आपले शिक्षक दोन महिन्यापासून आझाद मैदानावर बसले होते तरी शिक्षकांच्या प्रश्नाबद्दल तेव्हाच सरकार लक्ष द्यायला तयार नव्हतं आणि किती पैसे मागितले होते त्या ठिकाणी मदत करायची होती लागणार होते आणि मग 1100 कोटीचा निर्णय करता करता महाविकास आघाडीच्या नेत्यांनी शिक्षकांच्या प्रश्नांना लक्ष घातलं नाही.
पंकजाताई मुंडे यांनी पहाटेपासून ते रात्रीपर्यंत किरण पाटील यांच्या प्रचारात पूर्ण ताकदीने मतदारांच्या गाठीभेटी व उमेदवार निवडून आणण्याचा चंग बांधल्यामुळे ऊर्जा निर्माण झाली आहे.
पंकजाताई मुंडे
शिक्षकांच्या बदल्या मध्ये मोठा आर्थिक पुर्वी होत असे पती-पत्नी वेगवेगळ्या ठिकाणी असत त्यांना बदलीसाठी लोकांकडे जोडे घासावे लागायचे
जोडे येऊन रडायचे ;आणि जेव्हा एक निर्णय आम्ही घेतला ऑनलाइन शिक्षक बदल्यांचा या निर्णयाबद्दल आम्हाला जबलपूर मध्ये प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते अवॉर्ड सुद्धा मिळालं कारण आम्ही ते कंप्यूटर प्रणाली केली.त्याचं कौतुक झाल आणि एकही रुपया न देता कोणाच्याही समोर जोडे न घासता शिक्षकांचे बदली झाली. अक्षरशा त्या गुरुने येऊन मला आशीर्वाद दिले. ते माझ्या पायापाशी बसले मी एकदम म्हणजे कावरी बावरी तुम्ही तर आमच्या डोक्यावरून हात ठेवायला पाहिजे या शिक्षकांना जर प्रसन्न मन राहिलं या शिक्षकांना जर महिन्याच्या पगाऱ्याची चणचण नाही भासली या शिक्षकांना तर शिक्षण द्यायचं सोडून दुसरे काम नाही लावली, स्वच्छता अभियानाचा सर्वे करा, पुन्हा त्या इलेक्शनचा सर्वे करा, जातीय जनगणनेचा सर्वे करा, इलेक्शनच्या दिवशी काम करणार हे शिक्षक ईतर बिनाकाम चांगलं ज्ञान देऊ शकतील.त्यामुळे ज्ञान देण्याचं काम त्यांना करून देण्यासाठी चांगली भूमिका असणार सरकार त्यांच्यासाठी लढणारे लोकप्रतिनिधी यांच्या आवश्यकता आहे.
अक्षय मुंदडा यांनी आपल्या प्रास्ताविकात म्हटले की,
आपल्याला सर्वां समोर बसलेल्या मतदारांच्या वतीने खात्री देतो की हे मतदार स्वर्गीय मुंडे साहेबांवरती आणि लोकनेते पंकजाताईंच्या नेतृत्वावरती विश्वास ठेवणारे मतदार आहेत. हे उमेदवार कोण आहे, काय आहे ,कसा आहे ते कधीही ते पाहत नाहीत.नमिता मुंदडाना
पंकजा ताईंना तिकीट दिल म्हणून आमदार झाल्या हे काळ्या दगडावरची ही रेष आहे आणि तशाच पद्धतीने सकाळपासून स्वतः ताईसाहेब ह्या पूर्ण प्रचारांमध्ये या ठिकाणी फिरत आहेत ज्यावेळेस किरण पाटील साहेबांचा प्रवेश ठरला त्यावेळेस किरण पाटील साहेबांनी पंकजाताईंना भेटण्यासाठी म्हणजे उज्जैन ला गेले महाकालचा आशीर्वाद घेत असताना ताई साहेबांचा आशीर्वाद त्यांना महाकालाच्या द्वारामध्ये भेटला आणि खरा कॉरिडोर तिथे उघडा झाला आणि ते कॉरिडोर तिथे उघडल्यानंतर त्यांचा पक्ष प्रवेश झाल्यानंतर जिल्ह्यामध्ये माझ्या मताने चांगल्या पद्धतीने ताई साहेबांच्या नेतृत्वाखाली त्यांना आघाडी मिळणारे यामध्ये माझ्या मनामध्ये कुठली मात्र शंका नाही.
यावेळी खा.प्रितमताई मुंडे यांचेसह उमेदवार किरण पाटील यांच्यासह इतरांचे समयोचित संभाषण झाले.