Spread the love

माजलगाव:–( प्रतिनिधी) माजलगाव विभागीय पोलीस अधिकारी डॉ.बी.धीरजकुमार यांच्या पथकाने शुक्रवारी रात्री दिनांक 20/ 1 /2023 रोजी रात्री 11:30 च्या दरम्यान 36 लाख21237 रुपयाचा गुटखा पकडला आहे.माजलगाव शहरात गुटक्याचा साठा असल्याची प्राथमिक माहिती समोर आली होती या प्रकरणी माजलगाव चे उपविभागीय पोलीस अधिकारी आयपीएस अधिकारी बी.धीरजकुमार यांनी पोलीस उपनिरीक्षक भास्कर कांबळे यांना कारवाई करण्याची सूचना दिली त्यानुसार पथकाने सूत्र हलवत रात्री 11:45 वाजता सुनील कदम यांच्या घराचा दरवाजा उघडून झडती घेतली असता घरात महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधित केलेला गुटखा म** मिळून आला आर एम डी पान मसाला, विमल पान मसाला, राज निवास सुगंधित पान मसाला, गोवा ,बाबा पान मसाला, हिरा पान मसाला, आर एम डी सेंट तंबाखू ,रॉयल 220 तंबाखू ,जाप्राणी जरदारॉयल ,717 तंबाखू ,ही एक तंबाखू असे दोन लाख तेरा हजार 67 रुपये किमतीचा गुटखा म** आरोपी सुनील कदम यांच्या घरी मिळून आला पथकातील अधिकारी सदर गुटखा कोठून आणला असे विचारले असता त्याने जरदारॉ माल मैदा तालुका बीड येथील बाळू भुमरे यांच्या आखाड्यावरूनश्रीधर रवींद्र ठोंबरे उर्फ पवन ठोंबरे यांच्याकडून घेतला असे की माहिती सांगितली त्यावर पथकाने आपला मोर्चा वळवत शनिवारीरात्री21रोजी दोन वाजता मंदा तालुका बीड येथील बाळू घुमरे यांच्या आखाड्याची झडती घेतली असता पत्र्याच्या गोडाऊन मध्ये छापा मारून त्यातराज राजनिवास गुटक्याच्या निळसर रंगाच्या 25 मोठ्या गोण्या ,ज्याची एकूण किंमत 95 हजार रुपये गोवा गुटख्याच्या पांढऱ्या कलरच्या 28 गुन्हे याची किंमत 22 लाख 17 हजार सहाशे रुपये जाफराने जर्दाच्या पाच गोण्या ज्याची किंमत 24 हजार रुपये अशी एकूण मैदा येथे 34 लाख 7 हजार 600 रुपये किमतीचा गुटखा मिळून आला माजलगाव व महिंदा येथील कारवाई छत्तीस लाख रुपये किमतीचा गुटखा जप्त करण्यात आला आहे यापथकात पोलीस हवालदार पोलीस उपनिरीक्षकभास्कर शंकरराव कांबळेयांच्यासहअस्तित कुमार देशमुखढगे नरवडेयांचा समावेश होता याप्रकरणी पोलीस उपनिरीक्षक भास्कर शंकरराव कांबळे यांच्या फिर्यादीवरून आज दिनांक 21 शनिवारी सुनील आसुरबा कदम राहणार जिजामाता नगर माजलगाव यांच्या राहते घरी व मंदा येथे बाळू घुमरे यांचा आखाड्यावर महाराष्ट्रात सार्वजनिक आरोग्याच्या दृष्टीने बंदी असलेली घातलेले असतानाही गोवा गुटखा, राजनिवास ,विमल पान मसाला, आर एम डी पान मसाला ,हिरा पान मसाला ,बाबा पान मसाला, जाफराने जर्द तंबाखूच्या चोरटी विक्री करण्याच्या उद्देशाने जवळ बाळगला म्हणून गुटखा किंमत 36 लाख 21 हजार 267 किमतीचा म** मिळून आला म्हणून माझी सुनील आश्रुबा कदम राहणार जिजामाता नगर माजलगाव ,श्रीधर रवींद्र ठोंबरे उर्फ पवन ठोंबरे राहणार बीड, बाळू भुमरे राहणार मैदा आरोपी क्रमांक तीन याने महाराष्ट्रात सार्वजनिक आरोग्याचे दृष्टीने बंदी घातलेला गुटख्यासाठी जागा भाड्याने दिली व संगणमतकरून जवळ बाळगला म्हणून भारतीय दंड विधान कलम 328 ,188, 272 ,273 ,34 प्रमाणे माजलगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.

सर्वाधिक पसंती

error: Content is protected !!