अंबाजोगाई(प्रतिनिधी)-छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) विभागातुन निवडणुकीसाठी उभा असलेले भाजपा तथा महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेचे अधिकृत उमेदवार श्री किरण पाटील यांच्या निवडणुक प्रचारासाठी भाजपाचे प्रदेश अध्यक्ष मा.चंद्रशेखर बावनकुळे तथा भाजपाच्या राष्ट्रीय सचिव पंकजाताई गोपीनाथ मुंडे, जिल्ह्याच्या खा.डॉ.सौ.प्रितमताई मुंडे यांच्या उपस्थितीत उद्या दि.20 रोजी सायंकाळी 5 वाजता खोलेश्वर महाविद्यालयाच्या मैदानावर शिक्षक, प्राध्यापक मतदार बंधुंचा भव्य मेळावा आयोजित करण्यात आल्याची माहिती केज विधानसभा मतदारसंघाच्या आ.सौ.नमिताताई अक्षय मुंदडा यांनी दिली. या कार्यक्रमाला धारूर, केज, अंबाजोगाई, परळी पंचक्रोशीतील मतदारांनी उपस्थित राहण्याचे आवाहन त्यांनी केले.
प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात आ.मुंदडा यांनी म्हटले आहे की, छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) विभागात किरण पाटील भाजपा तथा शिक्षक परिषदेच्या माध्यमातुन निवडणुकीला उभे आहेत. पाटील हे बीड जिल्ह्यातील मुळचे रहिवाशी असुन अनेक वर्षापासून शिक्षण क्षेत्रात धडपडणारा कार्यकर्ता ही त्यांची ओळख आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक, उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ, पुणे तथा संभाजीनगर विभागात शासकिय सदस्य म्हणून काम करताना त्यांनी आपल्या कर्तृत्वाने काम करून दाखवलेले आहे. शिक्षकांच्या अनेक प्रश्नावर त्यांनी घेतलेला पुढाकार उल्लेखनीय वाटतो. महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेच्या माध्यमातुन निवडणुक लढवताना भारतीय जनता पार्टीने अधिकृत त्यांना पाठिंबा दिला. निवडणुकीच्या पहिल्या टप्यात सर्वत्र पाठिंबा मिळत असुन त्यांच्या प्रचारासाठी उद्या 20 रोजी मान्यवर अंबाजोगाई शहरात येत असल्याची माहिती त्यांनी दिली. सायंकाळी 5 वाजता खोलेश्वर महाविद्यालयाच्या मैदानावर भव्य मेळावा संपन्न होईल ज्यात मा.प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, आमच्या नेत्या मा.पंकजाताई मुंडे, खा.डॉ.प्रितमताई मुंडे यांचे मार्गदर्शन होईल. या कार्यक्रमासाठी निवडणुक प्रभारी मा.आ.श्री राणाजगदिशसिंह पाटील, निवडणुक समन्वयक श्री बसवराज मंगरूळे आप्पा, जिल्हाध्यक्ष श्री राजेंद्र मस्के, आ.लक्ष्मण आण्णा पवार, सुरेश धस, श्री आर.टी.देशमुख, श्री भिमराव धोंडे, जेष्ठ नेते
नंदकिशोर मुंदडा, युवा नेते अक्षय मुंदडा, रमेशराव आडसकर, भाशिप्र कार्यवाह डॉ.हेमंत वैद्य, स्थानिक कार्यवाह बिपिन क्षीरसागर, दीनदयाळ बँक चेअरमन अॅड.मकरंद पत्की, मोहन जगताप.स्वरूपसिंह हजारी, तालुका अध्यक्ष अच्युतराव गंगणे, भगवान केदार, सतिश मुंडे, अॅड.बालासाहेब चोले आदी मान्यवरांसह पक्षाचे सर्व पदाधिकारी उपस्थित राहणार असल्याचे त्यांनी पत्रकात म्हटले आहे. या कार्यक्रमाला पंचक्रोशीतील शिक्षक, प्राध्यापक मतदार बंधु शिवाय पक्षाचे सर्व पदाधिकारी तथा कार्यकर्त्यांनी उपस्थित रहावे असे आवाहन आ.नमिताताई मुंदडा यांनी केले.
