Spread the love

अंबाजोगाई (प्रतिनिधी)राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद जयंती निमित्ताने दि. १२ जानेवारी रोजी राष्ट्र चेतना दौड स्पर्धेचे आयोजन वसुंधरा सेवा प्रतिष्ठानच्या वतीने करण्यात आले असून या राष्ट्र चेतना दौड स्पर्धेत युवक,तरुण, युवती यांच्यासह पस्तीस वर्षावरील महिला पुरुषानी सहभाग घेतला.यात महाराष्ट्राच्या अनेक जिल्ह्यातील स्पर्धक सामिल झाले होते.

सदरील राष्ट्र चेतना दौड ही स्पर्धा महिला आणि पुरुषांसाठी स्वतंत्र दोन गटात घेण्यात येणार आहे. पहिला वयोगट १७ ते ३५ वर्षाचा असेल त्यासाठी ६ किमी चे अंतर ठरवण्यात आले होते. तर दुसरा वयोगट ३५ वर्षापुर्वी असणार असून त्यांचेसाठी ३ किमी चे अंतर ठरवण्यात आले आहे. ही स्पर्धा आज१२ जानेवारी रोजी सकाळी सहा वाजता छत्रपती शिवाजी महाराज चौक येथून सुरू झाली होती.

पहिल्या गटांसाठी छत्रपती शिवाजी महाराज चौक – संत भगवान बाबा चौक ते परत छत्रपती शिवाजी महाराज चौक हे ६ किमी चे अंतर निश्चित करण्यात आले आहे. दुसऱ्या गटांसाठी छत्रपती शिवाजी महाराज चौक ते संत भगवानबाबा चौक हे ३ किमी चे अंतर निश्चित करण्यात आले होते.

या स्पर्धेत
तरुण (17 ते 35) पुरुष
1) सतिश रमेश गाडेकर ( औरंगाबाद) प्रथम
स्पर्धा विजेता रोख ५०००/- व प्रशस्तीपत्र, व प्रशस्तीपत्र,
2) विष्णू गणपत केंद्रे( केंद्रेवाडी)
व्दितीय स्पर्धा विजेता रोख रु ३०००/- व प्रशस्तीपत्र,
3) प्रतिक रातेंद्र जुळे ( नेकनुर भंडारवाडी) तृतीय स्पर्धा विजेता रोख रु. २०००/- व प्रशस्तीपत्र,
उत्तेजनार्थ
4) जाधव धैर्यशिल साहेबराव (अंबाजोगाई) रोख रु.500/व प्रशस्तीपत्र
———
वयोगट (17 ते 35) महिला गट
1) अश्विनी मदन जाधव
परभणी,प्रथम स्पर्धा विजेती रोख ५०००/- व प्रशस्तीपत्र,

2) शेप अर्चना विष्णू( लाडेवडगाव )
व्दितीय स्पर्धा विजेती रोख रु ३०००/- व प्रशस्तीपत्र,
3)सायली सर्जेराव गोचडे अंबाजोगाई
तृतीय स्पर्धा विजेती रोख रु. २०००/- व प्रशस्तीपत्र,
उत्तेजनार्थ
सिमा आत्मा जाधव 4) सिमा
अंबाजोगाई रोख रु.500/व प्रशस्तीपत्र
————–
35 वर्षे पुढील/पुरुष)गट

1) रमेश भिमराव चव्हाण (परळी)
प्रथम स्पर्धा विजेता रोख ५०००/- व प्रशस्तीपत्र,
२) नितिन राजेंद्र थोरात (अंबाजोगाई)
व्दितीय स्पर्धा विजेता रोख रु ३०००/- व प्रशस्तीपत्र,
3) रविद्र विश्वनाथ शिंदे ( अंबाजोगाई)
तृतीय स्पर्धा विजेता रोख रु. २०००/- व प्रशस्तीपत्र,
उत्तेजनार्थ
केशव मनोहर खाडे
(अंबाजोगाई)रोख रु.500/व प्रशस्तीपत्र
——————
(36 वर्षापुढील महिला)

1) ज्योती शंकरराव गवते
(परभणी)प्रथम स्पर्धा विजेती रोख ५०००/- व प्रशस्तीपत्र,

२) उषा अविनाश चाटे
(केज)व्दितीय स्पर्धा विजेती रोख रु ३०००/- व प्रशस्तीपत्र,

3) ज्ञानेश्वरी मुक्ताराम दंडवते (देवळा)
तृतीय स्पर्धा विजेती रोख रु. २०००/- व प्रशस्तीपत्र,
उत्तेजनार्थ
४) रेखा विष्णू दराडे (वंजारवाडी)
रोख रु.500/व प्रशस्तीपत्र विजेते ठरले आहेत.
या शिवाय या राष्ट्र चेतना दौड स्पर्धेत सहभाग घेणा-या प्रत्येक स्पर्धकाला सहभाग प्रमाणपत्र देण्यात आले.

विजेत्या स्पर्धकांना भाजपाचे ज्येष्ठ नेते नंदकिशोर मुंदडा, राष्ट्रीय खेळाडू दगडू चव्हाण, क्रीडा मार्गदर्शक दत्ता देवकते, डॉक्टर सिद्धेश्वर बिराजदार पत्रकार सुदर्शन रापतवार , दत्ता आंबेकर, डॉक्टर रूपाली , डॉक्टर सत्यजित ,एड. सतीश केंद्रे, संजय गंभीरे, प्रशांत आदनाक,शेख ताहेर भाई,
श्रीमती किरण खरटमोल, लंके सर,
यांच्या हस्ते बक्षीस प्रदान करण्यातआले. हा कार्यक्रम यशस्वीतेसाठी
माजी नगराध्यक्ष महादू मस्के,पंडीत जोगदंड,अँड. संतोष लोमटे , कडबाने , वैजनाथ देशमुख डॉ. निशिकांत पाचेगावकर ,
हिंदूलाल काकडे,प्रकाश बोरगावकर,अनंत अरसुडे,योगेश कडबाने,अहमद पप्पूवाले
यांच्यासह वसुंधरा प्रतिष्ठानच्या कार्यकर्तेंनी परिश्रम घेतले.

Leave a Reply

Your email address will not be published.

सर्वाधिक पसंती

error: Content is protected !!