अंबाजोगाई(प्रतिनिधी): प्रियदर्शनी क्रीडा सांस्कृतिक मंडळाच्या वतीने आयोजित बालझुंबड-२०२३ मधील समुहनृत्य स्पर्धेत विविध शाळांच्या ४५ संघातील विद्यार्थ्यांनी बहारदार असा नृत्याविष्कार सादर करत परीक्षकांना मंत्रमुग्ध केले . प्रियदर्शनी क्रीडा ,सांस्कृतिक व व्यायाम मंडळाने मागच्या २३ वर्षा पूर्वी सुरू केलेला बालझुंबड हा उपक्रम आज केवळ अंबाजोगाई शहरपूरता मर्यादित राहील नसून त्याची व्याप्ती आज मोठ्या प्रमाणावर झाल्याचे दिसून येत असल्याचे मत प्रशिता इंटरनॅशनल स्कुलचे प्राचार्य नागरगोजे यांनी व्यक्त केले आहे. ते आज बालझुंबडचे तिसरे पुष्प आद्यकावी मुकुंदराज सभागृहात गुंफतांना बोलत होते. यावेळी व्यासपीठावर माजी नगरसेवक संतोष शिनगारे , ऍड दयानंद लोंढाळ,पत्रकार महादेव गोरे, जोधप्रसादजी मोदी विद्यालयाच्या जोशी मॅडम, परीक्षिका स्नेहा शिंदे,आणि तनुजा शिंदे या उपस्थित होत्या.
उपक्रमाची सुरूवात दीपप्रज्वलन तसेच साने गुरुजींच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून करण्यात आली. आपल्या प्रस्तावनेत राजेश कांबळे यांनी प्रियदर्शनी क्रीडा व सांस्कृतिक मंडळाच्या वतीने आयोजित करण्यात येत असलेल्या बालझुंबड या उपक्रमाची संकल्पना विशद केली. मंडळाचे संस्थापक अध्यक्ष राजकिशोर मोदी यांनी सुरु केलेला बालझुंबड हा उपक्रम शालेय विद्यार्थ्यांसाठी आज एक सांस्कृतिक व्यासपीठ निर्माण झाल्याचे सांगितले .
आपल्या अध्यक्षीय भाषणात प्रशिता इंटरनॅशनल स्कुलचे प्राचार्य प्रेमचंद नागरगोजे यांनी प्रियदर्शनी क्रीडा सांस्कृतिक व व्यायाम मंडळाचे अध्यक्ष राजकिशोर मोदी यांनी २३ वर्षा पुर्वी सुरू केलेला बालझुंबड हा उपक्रम आज केवळ अंबाजोगाई पुरताच राहिला नसून ते एक मोठे खुले व्यासपीठ बनले असल्याचे चित्र स्पष्ट होत असल्याचे मत नागरगोजे यांनी व्यक्त केले. यावेळी ऍड दयानंद लोंढाळ यांनी देखील आपले मनोगत मांडले.
आजच्या समूहनृत्य या स्पर्धेसाठी इयत्ता १ली ते १० वी या गटातुन ४५ संघ सहभागी झाले होते. आजच्या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शरद शिंदे यांनी तर आभार आनंद टाकळकर यांनी व्यक्त केले . समुहनृत्य या स्पर्धेच्या परीक्षक म्हणून स्नेहा शिंदे आणि तनुजा शिंदे या स्पर्धेचे परीक्षण करत होत्या. ही स्पर्धा संपन्न करण्यासाठी , मुख्यध्यापक चंद्रकांत गायकवाड , सुनील व्यवहारे, विजय रापतवार तसेच कुलकर्णी सर यांनी परिश्रम घेतले.