प्रतिनिधी | अंबाजोगाई
दि.६ : व्हॉईस ऑफ मीडिया या देशभरात सक्रिय असलेल्या पत्रकार संघटनेकडून दर्पण दिनानिमित्त ठिकठिकाणी भरगच्च कार्यक्रमांचे आयोजन केले होते. येथील तालुका कार्यकारिणीने ज्येष्ठ संपादक, पत्रकारांचा सत्कार करून त्यांना शुभेच्छा दिल्या.
येथील ज्येष्ठ संपादक प्रा. नानासाहेब गाठाळ, संपादक तथा लेखक अशोक गुंजाळ, जेष्ठ पत्रकार अमर हबीब यांचा निवासस्थानी जाऊन व्हॉईस ऑफ मीडियाच्या पदाधिकाऱ्यांनी सत्कार केला. तसेच, व्हॉईस ऑफ मीडियाचे तालुका उपाध्यक्ष प्रा.डॉ.संतोष बोबडे यांना पीएचडी मिळाल्याबद्दल प्रा. नानासाहेब गाठाळ यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. याप्रसंगी व्हॉईस ऑफ मीडियाचे जिल्हा प्रसिद्धीप्रमुख शुभम खाडे, तालुकाध्यक्ष प्रदीप तरकसे, कार्याध्यक्ष अतुल जाधव, उपाध्यक्ष प्रा. संतोष बोबडे, उपाध्यक्ष गणेश जाधव, सरचिटणीस देविदास जाधव, संदीप जाधव उपस्थित होते. दरम्यान, सत्कारावेळी ज्येष्ठ संपादक, पत्रकारांनी पत्रकारितेतील अनुभव मांडला. त्यातून आगामी काळात सकारात्मक पत्रकारिता करण्याचा निर्धार व्हाईस ऑफ मीडियाच्या पदाधिकारी, सदस्यांनी दर्पण दिनी केला आहे.