Spread the love

 

अंबाजोगाई – ज्येष्ठ साहित्यीक तथा विचारवंत राजनखान यांच्या संकल्पनेतून आक्षर मानव ही संस्था 1986 साली स्थापन झाली. या संस्थेच्या माध्यमातून 90 विषयांवर संशोधन आणि कार्य करण्यात आले. ही संस्था पुणे मुंबई सारख्या शहरामध्येच विसावली मराठवाड्याला या संस्थेत काम करण्याची संधी आता पर्यंत मिळाली नव्हती. 3 डिसेंबर रोजी पुणे येथे राजनखान यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीमध्ये राज्य कार्यकारीणी जाहिर करण्यात आली या कार्यकारीणीत आक्षर मानव महाराष्ट्र राज्य एकांकीका विभागाच्या अध्यक्षपदी अंबाजोगाईचे सुपूत्र राजू वाघमारे यांची बिनविरोध निवड करण्यात आली. या निवडीनंतर सर्व कार्यकारीणीने त्यांचे अभिनंदन केले.
आक्षर मानव संस्थेची 1986 साली स्थापना झाली या संस्थेने आतापर्यंत 90 विषयांवर विविध संशेाधन व कार्य केले आहे. यामध्ये माती पासून हवा, आकाश, साहित्य, काव्य, निसर्ग, इतिहास, भूगोल, विज्ञान, शिक्षण, मानववादी आदी विषयांवर सखोल अभ्यास करून त्यावर संशोधन करून साहित्य विकसीत केलेले आहे. 2017 साली बारामती तालुक्यातील मुर्टी येथे एकांकीका संमेलन पार पडले. या संमेलनामध्ये आक्षर मानव संस्थेतर्गंत महाराष्ट्र राज्य एकांकीका विभाग स्थापन करण्याचे संमेलनात घोषित झाले. त्यानूसार 3 डिसेंबर 2022 रोजी पुणे येथे राजनखान यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत आक्षर मानव संस्थेतर्गंत महाराष्ट्र राज्य एकांकीका विभाग स्थापन करून त्याची कार्यकारीणी जाहिर करण्यात आली. या वेळी आक्षर मानवच्या सर्व पदाधिकार्‍यांनी महाराष्ट्रातील नाट्य , साहित्य, काव्य, चित्रपट सृष्टीतील विविध भागातील कलावंतांची निवड करण्यात आली. या मध्ये आक्षर मानव महाराष्ट्र राज्य एकांकीकाच्या अध्यक्षपदी अंबाजोगाईसह मराठवाड्यात नाट्यक्षेत्रात नावाजलेले नाट्य कलावंत राजू वाघमारे यांची अध्यक्षपदी निवड करण्यात आली. उपाध्यक्षपदी मुंबई गिरगावचे असिफ अन्सारी यांनी बालरंग भूमीची चळवळ गतीमान करून राम गणेश गडकरी मानाचा पुरस्कार प्राप्त केला होता. त्यांनी अनेक नाट्य स्पर्धा, महोत्सवे याच्या माध्यमातून बाल कलावंत घडविणारे आसिफ अन्सारी यांची उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली. कार्याध्यक्षपदी मुंबईच्या कांदीवली भागातील माया बोरडे यांनी नाट्य, चित्रपट, मालिका या मधून कलाकारांसह दिग्गदर्शक , लेखक, गायक घडविले. त्यामुळे त्यांच्यावर कार्याध्यक्षाची जबाबदारी सोपविण्यात आली. तर सचिवपदी मराठी दलित रंगभूमीचा चिकित्सक अभ्यास करून पीएचडी प्राप्त करणारी जालना जिल्ह्यातील घणसावंगी येथील डॉ.प्रा.सिद्धार्थ तायडे यांची निवड करण्यात आली. संघटक म्हणून परभणी जिल्ह्यातील गंगाखेडचा गोपी मुंडे याने नविन कलाकार निर्माण करून एकांकीका नाटके व अनेक गाजलेली लघुपट त्याने तयार केलेली आहेत. कोषाध्यक्ष म्हणून सोलापुर येथील प्रा.डॉ.गणेश मुडेगावकर यांनी नाट्य क्षेत्रामध्ये समीक्षण मोठ्या प्रमाणावर केले आहे. म्हणून त्यांची निवड करण्यात आली आहे. कार्यवाह अहमदनगर जिल्ह्यातील श्रीरामपुरचे अजय घोगरे, चंद्रपुर जिल्ह्यात झाडीपट्टीवर कलावंत घडविणारे महेंद्र धिमटे यांची, सातारा जिल्ह्यातील जमीर अत्तार, अमरावती विभागामध्ये झाडीपट्टीवर नाट्य कलावंत घडविणारे राहुल वासणकर यांची देखील कार्यवाह म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे. या सर्व राज्य कार्यकारीणीच्या बैठकीस ज्येष्ठ साहित्यीक समिक्षण राजन खान यांनी एकमताने अनुमती देवून नविन पदाधिकार्‍यांचे अभिनंदन केले. सदरील कार्यकारीणीचे संबंध महाराष्ट्रामध्ये नाट्य क्षेत्रात, साहित्य क्षेत्रातील दिग्गजांनी अभिनंदन केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.

सर्वाधिक पसंती

error: Content is protected !!