Spread the love

 

अंबाजोगाई: प्रतिनिधी

महामानव परमपूज्य बोधिसत्व भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 67 व्या महापरिनिर्वाण दिना निमित्त महावंदना व अभिवादन सभेचे आयोजन “बुद्धिस्ट फाउंडेशन ऑफ इंडिया”अंबाजोगाईच्या वतीने करण्यात आले होते.या उपक्रमात हजारो नागरिकांनी सहभाग नोंदवलाआहे.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक बोधीघाट अंबाजोगाई. या ठिकाणी करण्यात आले होते. या कार्यक्रमाच्या प्रसंगी डॉ. बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी सर्व पक्ष गट /संघटनांना एकत्रित करून कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

सकाळी आठ वाजल्यापासून रात्री नऊ वाजेपर्यंत चौकातील तात्तपुरत्या पुतळ्यासमोर शहरातील हजारो मान्यवरांनी डॉ.बाबासाहेबांच्या पुतळ्यांना अभिवादन केले व रात्री बुद्ध वंदना घेऊन बाबासाहेबांचा पुतळा आणि बुद्ध मूर्ती सुरक्षित स्थळी हलवण्यात आली

याप्रसंगी अंबानगरीचे माजी नगराध्यक्ष तथा अंबाजोगाई पीपल्स बँकेचे अध्यक्ष राजकिशोर मोदी,माजी आमदार पृथ्वीराज साठे,माजी उपनगराध्यक्ष बबनराव लोमटे,मा. नगरसेवक महादेव आदमाने, मा.नगरसेवक संतोष शिनगारे, डॉक्टर असोसिएशनचे अध्यक्ष डॉक्टर राहुल धाकडे, प्रा. डी. जी. धाकडे, प्रा. एस. के .जोगदंड, प्राचार्य डॉ. कमलाकर कांबळे, एस. एस जावळे, अँड.अनंतराव जगतकर, भगवान ढगे, राजेंद्र घोडके, शैलेश कांबळे, प्रा. डॉ. कानेटकर, बन्सी जोगदंड, भारत सातपुते , संभजी सातपुते,अतुल ढगे, माऊली मांदळे, दीपक कांबळे, बाबा मांदळे ,महादेव पवळे, राजू मोरे, संघपाल जगताप, प्रियदर्शी मस्के, युवराज वाघचौरे, डी .एन. आचार्य, लंकेश वेडे, शशिकांत सोनकांबळे, कुमार वेडे, रमेश गायसमुद्रे, नामदेव आचार्य, अश्रुबा कांबळे, भीमाशंकर शिंदे, प्रा. डॉ .संतोष बोबडे, मंगल रोडे, सुचिता सोनवणे, सुनंदा घाडगे, शिल्पा गायकवाड, सुधाताई जोगदंड, प्रा. धाकडे मॅडम, विद्या कांबळे, ज्ञानोबा रोकडे, भारत खांडके, विशाल जोगदंड, सूर्यकांत जोगदंड, बी. व्ही. सोनवणे, रवी आचार्य, बाबा गवळे, बापू सोनवणे व बोधीघाट महिला मंडळ आणि शहरातील मान्यवर मंडळी उपस्थित होते.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक ॲड. सुनील सौंदरमल, संविधान प्रास्ताविकेचे वाचन डॉ. कमलाकर कांबळे,व आभार प्रदर्शन प्रा. डी. जी. धाकडे यांनी केले.या कामी शहर पोलीस स्टेशनचे पोलीस अधिकारी यांनी सहकार्य केले तसेच शहरातील अनेक दिग्गज मान्यवरांनी या कार्यक्रमासाठी उपस्थिती लावली बुद्धिस्ट फाउंडेशन ऑफ इंडिया अंबाजोगाईच्या सार्वजनिक उपक्रमास हजारो लोक सामिल झाले होते.

Leave a Reply

Your email address will not be published.

सर्वाधिक पसंती

error: Content is protected !!