Spread the love

अंबाजोगाई/प्रतिनिधी
अंबाजोगाई शहरात गेल्या 18 वर्षापासून सातत्याने जनसामान्यांसाठी आणि रस्त्यावर राबणार्‍या कष्टकर्‍यांसाठी मदतीचा हात ठरलेल्या अलखैर नागरी सहकारी पतसंस्था ही स्वतःच्या हक्काच्या इमारतीत स्थानापन्न होत आहे. हे एक खूप मोठे पर्व मानले जात आहे. या नुतन इमारतीचा उद्घाटन सोहळा रविवार दि.11 डिसेंबर रोजी सकाळी 11 वाजता मंडी बाजार भागातील अरिश कॉलनी या ठिकाणी संपन्न होणार आहे. या इमारतीचे उद्घाटन बीड जिल्ह्याच्या लोकप्रिय व कर्तव्यप्रिय खा.डॉ.प्रितमताई मुंडे यांच्या हस्ते होत असून यावेळी आ.नमिताताई मुंदडा व शिक्षक आ.विक्रम काळे यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित राहणार असून या उद्घाटन समारंभाला अलखैर नागरी सहकारी पतसंस्थेचे सर्व सभासद, ग्राहक, हितचिंतक, स्नेहीजण आदींनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून सहकार्य करावे असे आवाहन पतसंस्थेचे चेअरमन शेख उमर फारुक यांनी केले आहे.
अलखैर नागरी सहकारी पतसंस्था ही गेल्या 18 वर्षापूर्वी शहरात दाखल झाली. पहिल्या दिवसापासूनच विना व्याजी तत्वावर याची सुरुवात झाली. केवळ अल्पसा सेवा शुल्क घेऊन ग्राहकांना चांगली व तत्पर सेवा देण्यासाठी त्याची गरज आहे. 28 हजार रुपयांच्या भागभांडवलावर सुरु झालेली पतसंस्था आज करोडो रुपयांच्या भांडवल बाळगून आहे. ज्याचा लाभ सभासदांना व कर्जदारांना होतो. पतसंस्थेने मातब्बरांना आणि प्रतिष्ठीतांना महत्व न देता तळगळातील सर्वसामान्य व ज्याची पत आणि प्रतिष्ठा नाही अशांना सक्षम व स्वावलंबी बनविण्यासाठी प्रयत्न केले. आज तो उद्देश सफल होताना दिसतो आहे. अलखैर नागरी सहकारी पतसंस्था ही स्वतःच्या जागेत सर्व सुविधानिशी स्थिर होत आहे. यामुळे दरवर्षी भाडेपोटी जाणार्‍या लाखो रुपयांची बचत होणार आहे. त्यातून सभासद हिताचा विचार केला जाणार आहे. पतसंस्थेने सामाजिक कार्यामध्ये आपले योगदान दिलेले असून दरवर्षी वेगवेगळ्या उपक्रमांमध्ये पतसंस्थेचा पुढाकार असतो. या पतसंस्थेच्या इमारतीचा उद्घाटन सोहळा रविवार दि.11 डिसेंबर रोजी सकाळी 11 वाजता मंडीबाजार भागातील आरीश कॉलनी या ठिकाणी होत आहे. या इमारतीचे उद्घाटन बीड जिल्ह्याच्या लोकप्रिय खा.डॉ.प्रितमताई मुंडे यांच्या हस्ते होणार आहे. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी दिल्ली येथील सहुलत मायक्रो फायनान्सचे मुख्य कार्यकारी अधिकारी अरशद अजमल हे राहणार आहेत. तर प्रमुख अतिथी म्हणून केज विधानसभा मतदार संघाच्या आ.नमिताताई मुंदडा, शिक्षक मतदार संघाचे आ.विक्रम काळे, बीड येथील माजी आ.सय्यद सलीम, महाराष्ट्र राज्य पतसंस्था फेडरेशनचे चेअरमन ओमप्रकाश (काका) कोयटे, जेष्ठ समाजसेवक नंदकिशोर मुंंदडा, सहकारी संस्था लातूरच्या विभागीय निबंधक श्रीमती ज्योतीताई लाटकर-मेटे, दिल्ली येथील सहुलत मायक्रो फायनान्सचे उपमुख्यकार्यकारी अधिकारी उसामाखाँन, जमियत ए उलमा चे बीड जिल्हा अध्यक्ष मौलाना मुफ्मी अश्फाक, अंबाजोगाई येथील युवा उद्योजक शेख शकील बागवान, अंबाजोगाई येथील नॅशनल मल्टिपर्पज एजुकेशन सोसाायटीचे अध्यक्ष खमरोद्दीन फारोक्की, बीड येथील राहत अर्बल के्रडिट सोसायटीचे चेअरमन सय्यद शफीक हाश्मी आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत. तरी या कार्यक्रमास उपस्थित राहण्याचे आवाहन पतसंस्थेचे मार्गदर्शक तथा माजी उपनगराध्यक्ष शेख रहीम अब्दुल रज्जाक तसेच पतसंस्थेचे चेअरमन शेख उमर फारुक, व्हाईस चेअरमन मोहम्मद मुज़म्मील खतीब व सचिव शेख तालेब चाऊस यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.

सर्वाधिक पसंती

error: Content is protected !!