Spread the love

गुरुजी तुम्ही सुध्दा! विकृत शिक्षकास अटक; 23 पर्यंत पोलिस कोठडी

पोर्ले तर्फ ठाणे (ता. पन्हाळा) येथील मुलींच्या प्राथमिक शाळेत शिक्षक असलेल्या ‘त्या’ शिक्षकास पन्हाळा पोलिसांनी रविवारी अटक केली. नामदेव मारुती पोवार असे त्याचे नाव असून त्याला पन्हाळा न्यायालयात हजर केले असता 23 नोव्हेंबरपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले. ही माहिती पन्हाळ्याचे पोलिस निरीक्षक अरविंद काळे यांनी दिली.

मुलींच्या प्राथमिक शाळेत शिक्षक असलेल्या नामदेव पोवार या नराधम शिक्षकाने आपल्या शाळेतील अल्पवयीन विद्यार्थिनींचे लैंगिक शोषण केले आहे. https://bit.ly/3MulwsO या विकृत शिक्षकावर पन्हाळा पोलिसांनी कशाल रात्री उशिरा पोस्को कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.* विद्यार्थिनींच्या बाबतीत असा घृणास्पद प्रकार शिक्षकाकडूनच घडल्याने नागरिकांतून संतप्त प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत.

https://bit.ly/3MulwsO
दरम्यान, जिल्हा परिषद शिक्षण विभागाने तातडीने या शिक्षकाची चंदगडला बदली केली आहे. या प्रकरणाचा अधिक तपास सहायक पोलिस निरीक्षक शैलजा पाटील करत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published.

सर्वाधिक पसंती

error: Content is protected !!