Spread the love

 

अनेक महिलांनी आपले वय विसरून खेळाचा आनंद लुटला

अंबाजोगाई ():- संपूर्ण महाराष्ट्रातील महिलांमध्ये अत्यंत प्रसिद्ध झालेला होम मिनिस्टर हा कार्यक्रम अंबाजोगाई शहरात काल (दि १८),शुक्रवार रोजी अंबानगरीचे माजी नगराध्यक्ष राजकिशोर मोदी यांच्या वाढ दिवसानिमित्ताने राजकिशोर मोदी मित्र मंडळाच्या वतीने आयोजित करण्यात आला होता . या कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण होते क्रांतीनाना मळेगावकर व सह्याद्री मळेगावकर . या कार्यक्रमास दोन ते अडीच हजार महिलांनी आपला उत्स्फूर्त प्रतिसाद दर्शविला होता . तसेच कार्यक्रमाच्या आयोजकांच्या वतीने मानाच्या पैठणीसह इतर शंभरावर बक्षिसांची लयलूट करण्यात आली होती .
या कार्यक्रमाची सुरुवात क्रांतीनाना यांच्यासह सुनीता मोदी व सरोज मोदी यांच्या हस्ते दीप प्रज्वलन व श्री योगेश्वरी देवीच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आले . कार्यक्रम प्रसंगी राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावरील अवॉर्ड विजेती सह्याद्री क्रांतीनाना मळेगावकर हिने श्री गणेशाचे स्तवन गाऊन कार्यक्रमाची रंगीतदार सुरवात केली . होम मिनिस्टर , खेळ रंगला पैठणीचा या सदाबहार कार्यक्रमात नव विवाहित तरुणीपासून पासस्ट वर्षाच्या आजीबाईंनी आपला उत्स्फूर्त प्रतिसाद नोंदविला .
या स्पर्धात्मक कार्यक्रमात सहभागी महिलांना विविध प्रकारचे खेळ खेळवून त्यातील विजेत्या महिलांना मानाच्या पैठणीसह आकर्षक अशी बक्षीस देण्यात आली .ज्यामध्ये टीव्ही , फ्रिज , वॉशिंग मशीन , शिलाई मशीन, सायकल, सोन्याची नथ , कुलर,मोबाईल, मिक्सर ,वॉटर फिल्टर , टेबल फॅन कुकर , गॅस शेगडी , थर्मास , हॉट पॉट , इस्त्री, डिनर सेट, ग्लास सेट, ब्लॅंकेट , बेडशीट यासह अनेक उत्तेजनार्थ बक्षिसांचा समावेश होता .

अनेक महिलांनी होम मिनिस्टर, खेळ रंगला पैठणीचा या कार्यक्रमात सहभागी होऊन आनंद लुटला

या कार्यक्रमात पासस्ट वर्षाच्या आजीबाईंसह अनेक नवविवाहित महिलांनी आपले वय विसरून या खेळात आपला सहभाग नोंदवला. तसेच आयोजित विविध खेळ खेळून व त्यात विजय संपादन करून मानाच्या बक्षिसांची लयलूट केली . या स्पर्धेसाठी आलेल्या प्रत्येक महिलेच्या वतीने महिलांच्या साठी असा कार्यक्रम अंबाजोगाई शहरात आयोजित करून परिसरातील महिलांना सहभागी करून घेतल्याबद्दल राजकिशोर मोदी मित्र मंडळ यांना धन्यवाद देत होत्या. तसेच यापुढेही असेच कार्यक्रम आयोजित करण्याची विनंती उपस्थित सर्व महिलांचा वतीने करण्यात येत होती . याचबरोबर वाढ दिवसा निमित्त राजकिशोर मोदी व त्यांच्या संपूर्ण कुटुंबाला निरोगी दिर्घयुष्य लाभो अशा प्रकारे शुभेच्छा दिल्या जात होत्या .
होम मिनिस्टर, खेळ रंगला पैठणीचा हा स्पर्धात्मक कार्यक्रम संपन्न करण्यासाठी राजकिशोर मोदी मित्र मंडळाचे माजी उपनगराध्य मनोज लखेरा,महादेव आदमाने, खालेद चाऊस ,तानाजी देशमुख,अमोल लोमटे, दिनेश भराडीया , सुनील व्यवहारे ,धम्मा सरवदे, माणिक वडवणकर , विजय रापतवार यांच्यासह अनेक पदाधिकारी यांनी मेहनत घेऊन महिलांच्या साठी आयोजित हा कार्यक्रम यशस्वी रित्या संपन्न केला .

Leave a Reply

Your email address will not be published.

सर्वाधिक पसंती

error: Content is protected !!