Spread the love

 

अंबाजोगाई प्रतिनिधी
हत्तीखाना परिसर येथे विवाहित तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना शहरात घडली आहे.

मिलिंद नगर आंबेजोगाई येथील रहिवासी
राहुल नर्सिंग पोटभरे वय 28 वर्षे हा शुक्रवारी दुपारी चार वाजता कुटुंबीयांशी फोनवर शेवटचे बोलणे झाले आज सकाळी जनावरासाठी चारा आणावयास गेलेल्या व्यक्तीला राहुल याचा मृतदेह दिसून आला. घरगुती किरकोळ वादामुळे रागाच्या भरात हत्तीखाना परिसर येथील घोडके यांच्या शेतात बाभळीच्या झाडास दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे.

राहुल याच्या आत्महत्या मुळे पोटभरे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून त्याच्या पश्चात आई, दोन भाऊ ,भावजय पुतणे, पत्नी असा परिवार आहे राहुल याचा मृतदेह शिवविच्छेदनासाठी स्वाराती रुग्णालयात आणला आहे.

राहुल पोटभरे यांचा अंतिम संस्कार विधी दासोपंत समाधी परिसर रेणुकाईदेवी मंदिर रोडवर आज दुपारी शनिवारी दिनांक 19 रोजी दुपारी चार वाजता होणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.

सर्वाधिक पसंती

error: Content is protected !!