Spread the love

मुंबई : राज्यातील विनाअनुदानित शाळेतील शिक्षकांच्या आझाद मैदानावरील आंदोलनाला यश आले आहे. आज मंत्रिमंडळात झालेल्या बैठकीत या शिक्षकांच्या मागण्या मान्य केल्या असून त्यांच्यासाठी 1 हजार 160 कोटींचे पॅकेज राज्य शासनाने जाहीर केले आहे. याबाबतची माहिती राज्याचे शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी आज माध्यमांना दिली.

जी.आर. (GR) लवकरच

केसरकर म्हणाले, चाळीस टक्क्यांवरुन साठ टक्क्यांवर पात्र ठरलेल्या शिक्षकांचा जीआर पुढच्या आठवड्यात प्रस्तावाची छाननी करून काढू. एकंदरीत पात्रता पूर्ण करू शकल्या नाही अशा शाळा वगळून आम्ही इतर सर्व शाळांना मान्यता देण्याचा निर्णय घेतला आहे.

वंचित शिक्षकांना लाभ

पावसाळी अधिवेशनात केसरकर म्हणाले होते की, गेली अनेक वर्षे जे शिक्षक वंचित राहीले आहेत त्यांच्यासह सर्वांचे निर्णय होतील. अघोषित, त्रुटी यांच्यासह ज्यांना ग्रँट सुरू केले त्यांना पुढचा हप्ता तत्वतः मान्य केले आहे. त्याचा लाभ त्यांना मिळेल. शिक्षकांनी जी मागणी केली होती त्यापेक्षा जास्त त्यांना शासनाने दिले आहे. आम्ही शिक्षकांना आंदोलन करू नका असे सांगितले होते. कारण विधानसभेत व विधानपरिषदेत जी घोषणा करतो ती आमच्यावर बंधनकारक असते, अन्यथा हक्कभंग होतो. कॅबिनेट बैठकीत सर्व सहकाऱ्यांशी चर्चा होत नाही तोपर्यंत आम्हांला कुठलीही घोषणा करता येत नाही. त्यामुळे मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांच्यावतीने शिक्षणमंत्री केसकर यांनी ही घोषणा केली आहे.
साठ हजार शिक्षकांना लाभ
केसरकर म्हणाले, लाभार्थी शिक्षकांची संख्या साठ हजार आहे. बाळासाहेबांच्या स्मृतीदिनाच्या दिवशी आम्ही सर्वांना न्याय देऊ शकलो याचा आनंद आहे. अनेक शिक्षक गेली बारा ते पंधरा वर्षापासून न्यायापासून वंचित राहीले होते. या शासनाने ऐतिहासिक निर्णय घेतला. 1 हजार 160 कोटी रुपयांची तरतूद आम्हाला करावी लागली आहे. असेही शिक्षणमंत्री याप्रसंगी म्हणाले

Leave a Reply

Your email address will not be published.

सर्वाधिक पसंती

error: Content is protected !!