Spread the love

 

माजलगाव दि. 18.11. 22 (प्रतिनिधी) : माजलगाव तालुक्यातील श्री संतनारायन बाबा देवस्थान, वांगी ता. माजलगाव यास “ब” वर्ग तिर्थक्षेत्राचा दर्जा मिळण्याबाबत शासनास प्रस्ताव सादर करण्यात आला होता. सदर प्रस्तावात मंजुरी मिळण्याबाबत तत्कालीन ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ व सद्याचे ग्रामविकास मंत्री गिरीष महाजन यांच्याकडे पाठपुरावा करून “ब” वर्ग तिर्थक्षेत्रास महाराष्ट्र शासनाच्या ग्रामविकास विभागाने तिर्थवि-2022/ प्रक्रं. 63/यो-6 दि.10 नोव्हेंबर 2022 रोजीच्या आदेशान्वये मंजुरी दिली असुन या तिर्थक्षेत्राच्या विविध विकास कामासाठी भविष्यात 2 कोटी रूपयाचा निधी उपलब्ध होणार असल्याची माहिती आ. प्रकाशदादा सोळंके यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.

सर्वाधिक पसंती

error: Content is protected !!