Spread the love

 

भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची भारत जोडो यात्रा राहुलजी गांधी यांच्या नेतृत्वाखाली सध्या महाराष्ट्रामध्ये आहे.भारत जोडा यात्रा हिंगोली जिल्ह्यांमध्ये असताना हिंगोली कडून वाशिम कडे जात असताना मराठवाडा किसान काँग्रेसचे अध्यक्ष तथा महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे पार्लमेंटरी बोर्ड सदस्य ॲड माधव जाधव यांना भारत जोडो यात्रेमध्ये सन्माननीय राहुलजी गांधी व महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष सन्माननीय नानाभाऊ पटोले साहेब यांचे सोबत चालण्याचा योग आला.यावेळी ॲड. माधव जाधव यांनी मराठवाडा व विदर्भातील शेतकरी आत्महत्यांचे प्रमाण जास्त असल्यामुळे शेतकरी आत्महत्या थांबवण्यासाठी भारतीय राज्यघटनेतील कलम 371 (2) ची प्रभावी अंमलबजावणी करणे गरजेचे असून भारतीय राज्यघटनेतील कलम 371 (2) नुसार देशाचे महामहीम राष्ट्रपती यांना विशेष अधिकार दिलेले असून त्या अंतर्गत मराठवाडा वैधानिक विकास महामंडळ व विदर्भ विकास महामंडळ यांची स्थापना करण्यात आलेली होती.परंतु 1952 पासून आज तागायत या दोन्ही महामंडळांना कसल्याही प्रकारचा निधी देण्यात आलेला नाही व भारतीय राज्यघटनेतील कलम 371 (2) च्या विशेष अधिकारांचा वापर करण्यात आलेला नाही.मराठवाडा व विदर्भ दोन्ही भागाचा सिंचनातील व ऊद्योगातील अनुशेष भरून काढण्यासाठी भारतीय राज्यघटनेतील कलम 371 (2) ची प्रभावी अंमलबजावणी करुन मराठवाडा वैज्ञानिक विकास महामंडळ व विदर्भ विकास महामंडळ यांना विशेष अधिकार देऊन भरघोस निधी देऊन या दोन्ही भागातील सिंचनाचा व ऊद्योगधंद्यातील अनुशेष भरून काढला तर शेतकरी आत्महत्या थांबतील.अशा प्रकारची विनंती ॲड.माधव जाधव यांनी सन्माननीय राहुलजी गांधी यांच्याकडे केली.महाराष्ट्राचे खंबीर लढवय्ये शेतकरी नेते सन्माननीय नानाभाऊ पटोले साहेब यांच्यामुळे ॲड.माधव जाधव यांना मराठवाड्यातील शेतकरी बांधवांची कैफियत सन्माननीय राहुलजी गांधी यांच्याकडे मांडण्याची संधी मिळाली त्यामुळे ॲड माधव जाधव यांनी सन्माननीय नानाभाऊ पटोले साहेब यांचे खूप आभार मानले.यावेळी ॲड माधव जाधव यांचे सोबत युवक काँग्रेसचे परळी विधानसभा उपाध्यक्ष रणजीत भाऊ हारे हे ऊपस्थीत होते.

Leave a Reply

Your email address will not be published.

सर्वाधिक पसंती

error: Content is protected !!