Spread the love

 

धुळ्यातील पोलीस प्रशिक्षण केंद्राच्या पोलीस निरीक्षकाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे.
या मयत पोलीस निरीक्षकाने लिहिलेल्या चिठ्ठीत कुणासही दोषी धरू नये असे लिहिले आहे.

धुळे येथील पोलीस प्रशिक्षण केंद्रात २०१९ पासून प्रवीण विश्वनाथ कदम हे पोलीस निरीक्षक सेवेत आहेत.
सायंकाळी उशिरा त्यांच्या निवासस्थानाचा दरवाजा बंद होता.
त्यामुळे काही सहकाऱ्यांनी त्यांचा दरवाजा वाजवला.
मात्र आतून प्रतिसाद मिळाला नसल्याने सहकाऱ्यांनी पाहिले असता कदम यांनी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची बाब उघडकीस आली.
त्यामुळे ही माहिती तातडीने शहर पोलीस ठाण्याचे निरीक्षक नितीन देशमुख यांना देण्यात आली.
त्यानुसार पोलीस पथक घटनास्थळी तातडीने पोहोचले. मयत कदम यांच्या खोलीत आत्महत्या करण्यापूर्वी चिठ्ठी लिहिल्याचे आढळून आले असून या चिठ्ठीमध्ये आपल्या मृत्यूस कुणासही कारणीभूत धरू नये असे लिहिले असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
मयत प्रवीण कदम हे पुणे येथून २०१९ मध्ये पोलीस प्रशिक्षण केंद्रात आले होते.
त्यांचा परिवार नासिक येथे राहत असल्याची माहिती मिळाली असून परिवाराला या संदर्भात कळवण्यात आले आहे.
दरम्यान या संदर्भात शहर पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.

*सांस्कृतिक कार्यक्रमाच्या तयारीला हजेरी*

धुळ्याच्या पोलीस प्रशिक्षण केंद्रात २१ नोव्हेंबर २०२२ रोजी दीक्षांत समारंभाचे आयोजन करण्यात आले आहे.
या समारंभासाठी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांची हजेरी लागणार होती.
यासाठी पोलीस प्रशिक्षण केंद्रातील जवानांचा सांस्कृतिक कार्यक्रम देखील आयोजित करण्यात आला होता.
प्रशिक्षण केंद्रात या कार्यक्रमाची तयारी सुरू होती.
या तयारीला दुपारी मयत पोलीस निरीक्षक कदम यांनी देखील हजेरी लावली.
मात्र हा सांस्कृतिक कार्यक्रम त्यांचा अखेरचा कार्यक्रम ठरला. यानंतर त्यांनी त्यांच्या निवासस्थानी जाऊन आपली जीवनयात्रा संपवली.

Leave a Reply

Your email address will not be published.

सर्वाधिक पसंती

error: Content is protected !!