Spread the love

स्टार सर्कस बीड मध्ये आल्यानंतर या सर्कसचे संचालक प्रकाश माने यांच्याशी संवाद साधून सर्कस विषयी माहिती घेण्याचा प्रयत्न केला तेव्हा सर्कस चा एक तंबू म्हणजे चारशे ते पाचशे लोकांच्या जगण्याची कसरत आहे हे समोर आले सर्कसचा एक शो दोन तासांचा असला तरी कलाकारांच्या जगण्याची कसरत असते स्टंट करत असतांना स्वतःचा जीव धोक्यात घालायचा आणी हसत हसत प्रेक्षकांचे मनोरंजन करायचे हा जगण्यासाठीचा खेळ या विषयी प्रकाश माने यांनी मोकळेपणाने चर्चा केली प्रकाश महादेव माने हे मूळ जत तालुक्यातील मांडग्याळ गावचे प्रकाश यांचे आजोबा रामाप्पा माने हे 1937 मध्ये तासगावच्या परशुराम माळी नावाच्या सर्कस मध्ये काम करायचे त्यानंतर प्रकाश यांच्या वडिलांनी वयाच्या आठव्या वर्षी सर्कस मध्ये काम करायला सुरुवात केली वयाच्या 28 व्या वर्षापर्यंत महादेव माने यांनी सर्कस मध्ये जोकर साकारत लोकांचे मनोरंजन केले परंतु ज्या सर्कसच्या तंबूत लोकांना हसवलं त्याच तंबूत त्यांचा अपघाती मृतीव झाला नाशिक जिल्ह्यात तंबू उचलत ही घटना घडली तेव्हा प्रकाश माने हे केवळ दोन वर्षाचे होते. दोन भाऊ आणी तीन बहीनींना लोकांना हसवणारा जोकर रडण्यासाठी सोडून गेला. सर्कशीचा ताबाही नातेवाकांनी घेतला पाच लेकरांना घेऊन प्रकाश यांची आई प्रकाश यांच्या आत्त्याच्या गावी जाऊन राहू लागली. त्या आत्त्याचिदेखील सर्कस होती लेकरांना शाळेत पाठवण्या पूर्वीच सर्कस मध्ये कामास जाण्याची वेळ आली त्यामुळे प्रकाश हे बाल जोकर सकारू लागले बापाने साकारलेला जोकर मुलगा साकारू लागला.1993 मध्ये 25 वर्षानंतर तेथूनही बाहेर पडावे लागले तेव्हा अहमदाबाद मधील मामाने व्याजाने पैसे काढून दिल्यामुळे न्यू गोल्डन नावाची सर्कस प्रकाश यांनी सुरु केली परंतु 2011 मध्ये आर्थिक अडचणीमुळे प्रकाश यांना ही सर्कस विकावी लागली. परंतु आजोबा पासून असलेला सर्कसचा लळा सुटला नाही पुन्हा छोटी सर्कस तयार करून प्रकाश नावाचा सर्कस मधील जोकर लोकांना हसवू लागला आज प्रकाश माने सुपरस्टार सर्कस घेऊन महाराष्ट्रासह वेगवेगळ्या राज्यात लोकांचे मनोरंज करून त्यांना हसवन्याचे काम करतात सुपरस्टार सर्कस मध्ये आसाम, नेपाळ, बंगाल, गुजरात महाराष्ट्र आदी राज्यातील 70 कलाकार काम करतात ज्यातून 400 ते 500 लोकांचा उदरनिर्वाह सुपरस्टार च्या मध्येमातून होतो. सर्कस संदर्भात बोलतांना प्रकाश माने म्हणतात सर्कस मधील प्राणी सर्कस चा प्राण होते आज सर्कस आहे पण तो प्राण मात्र नाही. प्रेक्षकांनाही ती उणीव भासते तरी देखील आम्ही मनोरंजन होईल असा खेळ दाखवतो. वेगवेगळ्या ठिकाणी फिरतांना चांगल्या अनुभवा बरोबरच काही अडचणीना सामोरेही जावे लागते. परंतु माझ्यामुळे कलाकारांना रोजगार मिळतो हे म्हणण्यापेक्षा त्यांच्या मुळे सर्कस आहे हे मी मानतो आणी त्यानंतर प्रेक्षक जे माझे दयवत आहे सर्कसच्या तंबूच्या देवळात प्रेक्षक येतात तेव्हा त्याला दिवघराचे स्वरूप येते असे सांगतांना कोरोना आम्हाला दुष्काळात राहण्यासारखा गेल्याचे प्रकाश म्हणाले दोन वर्ष सर्कस बंद असतांना कलाकारांच्या कुटुंबाचा पोटापाण्याचा प्रश्न निर्माण झाला होता. साताऱ्यातील शिरवळ मध्ये असतांना लॉकडाऊन झाले 14 महिने तिथे राहावे लागले. हतबल होऊन कलाकारांना इतर ठिकाणी कामे शोधावी लागली एका कंपनीत काम करत असतांना पोलिसांनी कारवाई करत गुन्हे दाखल केले. सर्कशीमध्ये जीवावर जीवावरबेतुशकतील असे स्टंट करून लोकांना हसवणाऱ्यांना त्या कारवाई नंतर रडण्याची वेळ आली होती तेव्हा खूप वेदना झाल्याचे सांगणाऱ्या प्रकाश यांनी कर्नाटकतल्या चिपोडी गावकऱ्यांचे कवतूक करत तेथील लोकांनी सात महिने आम्हाला सांभाळले अन्न धान्ये दिल्याचे ते म्हणाले. प्रकाश माने यांच्याशी बोलल्या नंतर सर्कसचा एक खेळ दोन तासांचा असला तरी सर्कस चालक आणी कलाकारांची जगण्याची सर्कस मात्र वर्षानुवर्ष चालू असते याचा उलगडा झाला

Leave a Reply

Your email address will not be published.

सर्वाधिक पसंती

error: Content is protected !!